Friday, November 7, 2008

swatanryaveer

सत्वशील तेज हे
द्रूढ्से बाहूबल
नेत्र खड्ग धार ती
हास्य मुख-कमलावर !

देशरक्षणे असे
प्राणपणा लाविले
जीवनध्येय तेच
तू वचने अंगिकारले !

धर्मव्रत घेतले
वाहे नसानसातून
हिंदू आम्ही सकल बन्धू
नारा स्वरस्वरातून !

कवित्व हे असे जणू
विज ही तमातूनी
मांडिली गहिरी वचने
सिध्द लेखणीतूनी !

हाल किती सोसिले
धिर न सोडे तरी
पुरुशार्थ काय असे खास
आदर्श हा जनावरी !

असा धैर्यशील , शक्तीशील
धर्मवीर तू
कुलदिपक अभिमानी
स्वातंत्र्यवीर तू
स्वातंत्र्यवीर तू !!!

charolee

चारोळी - भिमसेन जोशींसाठी
ध्यास एक
चेतलासुरासुरात जागला
रत्न खास भारती
सन्मान योग्य जाहला !

kavita

माझ्या मनास न कळती
तुझी गणिते ही व्यवहारी
माझ्या लेखी माझे तुझे
असणे एक जाहलेले !

मोजता न येई मजला
गुंतवणूक किती झाली
गुंतला हा जीव तुझ्यात
एवढेच मज कळलेले !

आखता न येई मजला
हि लक्ष्मणरेखा भावनांना
भाव माझे सारे आता
तुझ्याभोवती दंगलेले !

कठीण जाय किती मजला
हि वेळेची कहाणी
धीराच्या ह्या कसोटीत मी
पुरती नापास झालेले !

नको घालू वाद काही
हा भेद आहे कळलेला
तुझे माझे असे दुरूनी
मी चालणे आता पेललेले !

जान्हवी