.
सारयात असूनही , असे एकटे
मनात गडद , धुके दाटते !
सारे भोवतीने , माणसांचे कळप नी,
वाटे हरवले जणू कोकरू धाकटे !
बोलतो, बोलायास , किती असा तसा
मुकेच राहावे , परी खरे वाटते !
म्हनायास आहेत, सारी सुखे भोवताली
परी झोळी रिक्तच करी उरते !
जान्हवी
Wednesday, February 15, 2012
सांगावे कुणास ?
सांगावे कुणास ? बोलावे कुणाशी ?
मनाचे डाव , मांडावे कुणाशी ?
एकटेपणाचे आताशा , वाटू लागे ओझे ,
खांदे सोबतीचे , मागावे कुणाशी ?,
सोडावया बसले , कोडे जीवनाचे ,
उत्तराचे पान , मागावे कुणाशी ?,
जान्हवी
मनाचे डाव , मांडावे कुणाशी ?
एकटेपणाचे आताशा , वाटू लागे ओझे ,
खांदे सोबतीचे , मागावे कुणाशी ?,
सोडावया बसले , कोडे जीवनाचे ,
उत्तराचे पान , मागावे कुणाशी ?,
जान्हवी
Friday, January 20, 2012
kavita
सांगायचं बराच काही , मांडता येत नाही
चाक फिरवूनही आता , मनातला आकार , साकार होत नाही !
शब्द होऊन गेलेत खूप परके न भावनाही अनोळखी
घ्यावा लागतोय स्वताच्याच विचारांचा शोध ,
वाढवून आणिक विचारांची काळोखी !
मलभात दाटलेलं आहे भोवती , हवी ती किरणं कुठे हरवली ?
लक्ख सुर्याप्रकाशाताही , काळोखी आहे दाटली !
गहाळ झालीय प्रतिभा इतकी , कि शोधतोय "कोलावारी"तला गर्भित अर्थ
अडकल्या गुंत्याला सोडवू पाहणारे , मात्र अजूनही उरलेत मित्र !

जीवन
जीवन व्यस्त , मन अस्वस्थ
पैशाचा पूस , जगणे स्वस्त !
लखलखीत घर, वाढलेला स्तर
हरवलेला त्यातून , माणसांचा वावर !
विस्तारल्या दिशा , वाढत्या अपेक्षा
रंगोतीने दडवल्या , कपाळावरच्या रेषा !
मित्रांची संख्या , फुगलेला आकडा
मन रमवायला एकटेपणात , जीव पडतो तोकडा !
व्यवहारी जग , व्यवहारी नाती,
प्रेमाचा मांडून बाजार , चित्रपटांची चलती !
नवीन वर्षाचा , जोराचा जल्लोष ,
दडपून टाकायला मनातला , वाढलेला आक्रोश !

अजूनही अजूनही ...
अजूनही अजूनही ...
शोधतो पुन्हा तुला ,
सभोवती उन उन ,
अन पाउस डोळ्यात दाटला !
अजूनही अजूनही ...
गंध तुझाच भोवती ,
क्षणात भास संपतो ,
जग वाटे सारे अनोळखी !
अजूनही अजूनही ..
ठेचाळतो , न मिळे मार्ग सुकर ,
अजूनही जखमेवरी ,
मागतो तुझीच फुंकर !
शोधतो पुन्हा तुला ,
सभोवती उन उन ,
अन पाउस डोळ्यात दाटला !
अजूनही अजूनही ...
गंध तुझाच भोवती ,
क्षणात भास संपतो ,
जग वाटे सारे अनोळखी !
अजूनही अजूनही ..
ठेचाळतो , न मिळे मार्ग सुकर ,
अजूनही जखमेवरी ,
मागतो तुझीच फुंकर !
तुज लोचनात बांधिले ,
तुज लोचनात बांधिले , साठविले मन्मनी
उरले ना काही परंतू , रिती आज अंजली !
भाव प्रदेशी माझिया , वाजती तुझीच पैंजणे ,
कानातूनी अजूनही , नादती तव कंकणे !
घोटाळतो पुन्हा पुन्हा , मी तव आठव पानातूनी,
माझे प्रेम गाणे आणि तू फेकिले हातातूनी !
मन प्रेम भावे फुललेले , तुझ्या पायी नासले
बहरणे आता कसले , जगणेच सारे संपलेले !

विराणी
जगण्याने वार केले, कैफियत कुणा सांगावी ?
तुटले काही अंतरात , व्यथा कशी मांडावी ?
विझत गेले क्षण-क्षणांनी , ज्योत पुन्हा कशी फुलवावी
निर्माल्य झाली सुमने , गंधित आता कशाते व्हावी ?
चांगलेच होते सारे , चांगलाच तू ही , चांगलीच मी ही
परी अति झाले नि उतू गेले कि ,
चांगलेपनाची हार झाली
हुंदके दाटून आले , परी नेत्र मी कोरडेच ठेले
अश्रुंनो परतुनी जा , वाहण्याचीही आता चोरी झाली तुटले काही अंतरात , व्यथा कशी मांडावी ?
विझत गेले क्षण-क्षणांनी , ज्योत पुन्हा कशी फुलवावी
निर्माल्य झाली सुमने , गंधित आता कशाते व्हावी ?
चांगलेच होते सारे , चांगलाच तू ही , चांगलीच मी ही
परी अति झाले नि उतू गेले कि ,
चांगलेपनाची हार झाली
हुंदके दाटून आले , परी नेत्र मी कोरडेच ठेले
भावनांचा बाजार मांडला ,मोल कमी-जास्त ठरवोनी घ्या
ओलेती ही लेक माझी , आज पाठवणी झाली
म्हणत होते लिहून जावी , काही प्रीत गाणी
हाय ! पार हातून माझ्या , पुन्हा ही विराणीच झाली !
जान्हवी
Subscribe to:
Posts (Atom)