Friday, January 20, 2012

अजूनही अजूनही ...

अजूनही अजूनही ...
शोधतो पुन्हा तुला ,
सभोवती उन उन ,
अन पाउस डोळ्यात दाटला !

अजूनही अजूनही ...
गंध तुझाच भोवती ,
क्षणात भास संपतो ,
जग वाटे सारे अनोळखी !

अजूनही अजूनही ..
ठेचाळतो , न मिळे मार्ग सुकर ,
अजूनही जखमेवरी ,
मागतो तुझीच फुंकर !

No comments: