आम्ही पुजितो रामनमस्कार मंड्ळी, आपल्या हिंदू धर्माबद्दल मला अतिशय अभिमान आहे , परन्तू आपल्या पुरुष्प्रधान संस्क्रुतिबद्दल काही बोलावा वाटलं म्हणून लिहिलय... तेंव्हा गैरसमज नसावा हि विनंती !!!--------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही पुजितो राम
सिता केवळ त्याच्या सोबतखरा,
आम्ही पुजितो राम !
सितेची महती ? कोणा ठावी ..
’आदर्श राजा’ राम !
राम जन्म करितो आम्हीक्रुष्ण
जन्म करितो आम्ही
सितेच्या जन्माचे ठावे
केवळ एक अनुमान
आम्ही पुजितो राम !
राधा, मीरा आम्हा ठाव्या
ठाव्या कारण क्रुष्ण्सख्या त्या
क्रुष्णाचेच खरेतर जपतो
नित्य आम्ही ते नाम ..
आम्ही पुजितो राम !
ती ती द्रोपदी....हा हा ठावी
क्रुष्णाचा जी करिते धावा
असता पाच पांड्व नाथ
आम्ही पुजितो राम !
मातेस मारिले योग्य ते ही
आम्ही पुजितो परशूराम
आम्ही पुजितो राम !
पुराण जैसे, तैसे आता
स्त्रिची कसली असते महता?
कोणास ठावी तिची गाथा ?
हाच नित्य इतिहास..
आम्ही पुजितो राम !
पुजायाचा ’तोच’ केवळ’
तिस’ दास्यत्वाचे केवळ काम
आम्ही पुजितो राम !
जान्हवी
Saturday, February 21, 2009
तू प्रित भले त्या म्हणू नको ..
फ़ूल नवे फ़ूलतेच
आहेगंधभले तू घेउ नकोरंग
नवा खुलतोच आहे
रंग भले तू देउ नको ...
प्रभा नवी उमलतेच आहे
रात भले तू सोडू नको
प्रित मनी उमटतेच आहे
तू प्रित भले त्या म्हणू नको ..
जान्हवी
आहेगंधभले तू घेउ नकोरंग
नवा खुलतोच आहे
रंग भले तू देउ नको ...
प्रभा नवी उमलतेच आहे
रात भले तू सोडू नको
प्रित मनी उमटतेच आहे
तू प्रित भले त्या म्हणू नको ..
जान्हवी
मैत्र-ध्रुव..
तुझ्या भिजल्या
डोळ्यांमध्येमी परी होऊन यावान्तुझ्या
मिटल्या डोळ्यांमध्ये
सुख स्वप्न ठेवून जावं
तुझ्या वेदनेच्या सा-या मी
प्राशुनी घ्याव्या धारा
तुझ्या ओंजळीत आनंदाच्या
मी ठेवुनी जाव्या गारा
तुझ्यातल्या सुरवंटा साठी
मी पान पान व्हावं
तू फ़ुलपाखरी उडताना
मी तुला पहात रहावं
तुझ्या पोळलेल्या मनासाठी
माझी फ़ुंकर व्हावी
तुझी अमेची रात ती
माझ्या चांदण सरीत नहावी
तुझ्या गोंधळलेल्या वाटेसाठी
मी दीपस्तंभ व्हावं
तापवणा-या तुझ्या दुःख-उन्हात
मी सावली होऊन यावं
तुला हवं तेव्हा , हवं तिथे
मी नकळत समोर यावं
मैत्रीच्या या नात्यात मी
अटळ मैत्र-धृव व्हावं
अटळ मैत्र-धृव व्हावं
.......जान्हवी.....
डोळ्यांमध्येमी परी होऊन यावान्तुझ्या
मिटल्या डोळ्यांमध्ये
सुख स्वप्न ठेवून जावं
तुझ्या वेदनेच्या सा-या मी
प्राशुनी घ्याव्या धारा
तुझ्या ओंजळीत आनंदाच्या
मी ठेवुनी जाव्या गारा
तुझ्यातल्या सुरवंटा साठी
मी पान पान व्हावं
तू फ़ुलपाखरी उडताना
मी तुला पहात रहावं
तुझ्या पोळलेल्या मनासाठी
माझी फ़ुंकर व्हावी
तुझी अमेची रात ती
माझ्या चांदण सरीत नहावी
तुझ्या गोंधळलेल्या वाटेसाठी
मी दीपस्तंभ व्हावं
तापवणा-या तुझ्या दुःख-उन्हात
मी सावली होऊन यावं
तुला हवं तेव्हा , हवं तिथे
मी नकळत समोर यावं
मैत्रीच्या या नात्यात मी
अटळ मैत्र-धृव व्हावं
अटळ मैत्र-धृव व्हावं
.......जान्हवी.....
चालतायत ना वाटा
चालतायत ना वाटाअन
चालतात पायही
वाटेवरल्या फुलांचा गंधापन
मनात झिरपत नाही !
चालतायत ना वाटा
अन चालतात पायही
स्वरातला भाव पण
मनात उतरत नाही !
चालतायत ना वाटाअन
चालतात पायही
इंद्रधनूचा रंगही पण
ह्रुदयात उमलत नाही!
चालतायत ना वाटा
अन चालतात पायही
चालत जातेय कुठे मी
पणमलाच उमगत नाही!
जान्हवी
चालतात पायही
वाटेवरल्या फुलांचा गंधापन
मनात झिरपत नाही !
चालतायत ना वाटा
अन चालतात पायही
स्वरातला भाव पण
मनात उतरत नाही !
चालतायत ना वाटाअन
चालतात पायही
इंद्रधनूचा रंगही पण
ह्रुदयात उमलत नाही!
चालतायत ना वाटा
अन चालतात पायही
चालत जातेय कुठे मी
पणमलाच उमगत नाही!
जान्हवी
अंदाज
मानत काही होतेकीती
काळ , किती वेळ..
सारे अन कसे ते
फूके जाहलेले... !
सत्य मानले जे
जपले तिन्ही त्रिकाळ
सांगावे कसे कुणास
अंदाज ते निघाले !
काही होते उरात
स्वप्न पाहिलेले
काळजावरी त्यांचेच आता
वार फार झाले !
जान्हवी
काळ , किती वेळ..
सारे अन कसे ते
फूके जाहलेले... !
सत्य मानले जे
जपले तिन्ही त्रिकाळ
सांगावे कसे कुणास
अंदाज ते निघाले !
काही होते उरात
स्वप्न पाहिलेले
काळजावरी त्यांचेच आता
वार फार झाले !
जान्हवी
नको मागे वळून पाहू !
नको मागे वळून पाहू !
दोष तुझे
माझेव्यर्थ मोजणे हे
कुरवाळत त्यांना
नको उगा राहू !
शब्द बोललेले
काही असे तसे
अर्थ त्यांच्यात तू
नको शोधून पाहू !
झाले गेले काही
भूतकाळ सारा झाला
वर्तमान त्याच्याशी
नको जोडून पाहू !
उरले हाती काही
अम्रुत क्षण थोडे
खुळ्या त्या क्षणांना
नको विसरून जाऊ!
उभा ठाकला हा
मोठा काळ पसारा
वेचित जा तू सुमने
नको मागे वळून पाहू!
जान्हवी
दोष तुझे
माझेव्यर्थ मोजणे हे
कुरवाळत त्यांना
नको उगा राहू !
शब्द बोललेले
काही असे तसे
अर्थ त्यांच्यात तू
नको शोधून पाहू !
झाले गेले काही
भूतकाळ सारा झाला
वर्तमान त्याच्याशी
नको जोडून पाहू !
उरले हाती काही
अम्रुत क्षण थोडे
खुळ्या त्या क्षणांना
नको विसरून जाऊ!
उभा ठाकला हा
मोठा काळ पसारा
वेचित जा तू सुमने
नको मागे वळून पाहू!
जान्हवी
Friday, February 6, 2009
घडते असे असे..
चढलेली रात
शान्त सार्या दिशा
परी जगताती
माझ्या सार्या आशा ..
माझे थकलेले तन
अन जड झाले डोळे
पण वाट पाहणेहे
सोडवेना..
पण लागलासे डोळा
निजेने घातली झडप
परी चित्त तुझे ठायी
आपोआप..
स्वप्नपरीने मग
कैसी दाविलिसे माया
संगम प्रितीचा
घडलेला..
जान्हवी
शान्त सार्या दिशा
परी जगताती
माझ्या सार्या आशा ..
माझे थकलेले तन
अन जड झाले डोळे
पण वाट पाहणेहे
सोडवेना..
पण लागलासे डोळा
निजेने घातली झडप
परी चित्त तुझे ठायी
आपोआप..
स्वप्नपरीने मग
कैसी दाविलिसे माया
संगम प्रितीचा
घडलेला..
जान्हवी
तव बोल हे झंकारले
तव बोल हे झंकारलेअन
सप्तसूर हि ओशाळले
सांगू तुला कसे सख्या
मम मन हे किती नादावले...१
ह्या तारकाही लाजल्या
तव हास्य-ज्योती दिपता
आकाशही दडले कुठे
तु प्रेमभराने पाहता..२
मालवले बघ दीप हे
तव नेत्र-दीप तेजाळता
रवितेज हि फिके फिके
तु प्रेमभराने पाहता...३
आचंबिली तव दर्शने
स्रुष्टी हि आक्रसिली
आनंदले मी ओतप्रोत
हि प्रित तव चरणी वाहिली..४ !
जान्हवी
सप्तसूर हि ओशाळले
सांगू तुला कसे सख्या
मम मन हे किती नादावले...१
ह्या तारकाही लाजल्या
तव हास्य-ज्योती दिपता
आकाशही दडले कुठे
तु प्रेमभराने पाहता..२
मालवले बघ दीप हे
तव नेत्र-दीप तेजाळता
रवितेज हि फिके फिके
तु प्रेमभराने पाहता...३
आचंबिली तव दर्शने
स्रुष्टी हि आक्रसिली
आनंदले मी ओतप्रोत
हि प्रित तव चरणी वाहिली..४ !
जान्हवी
दुष्काळ
पावसाने कोठे दडीमारलेली
दुष्काळ दाटला चहूदिशा
जीवन जिवनात मिळणे कष्ट्प्रद
दूरची नदी खुणावते....
तप्त तापली धरणी
आग ओके ऊन
परी पाय चालतात
झपझप..
इवलिशी पोर
वाही संसाराचा भार
मुलपण सारे हरवले..
सावळीशी काया
रापलेली पार
डोळ्यांत कारुण्य अपार
दाटलेले..
नदिचाया आता
उरला ओहोळ
पाणी सगळाले
आटलेले..
होउन हताश
घागर टेकली
डोळ्यांच्या पूरात
वाहिलेली.. !
जान्हवी
दुष्काळ दाटला चहूदिशा
जीवन जिवनात मिळणे कष्ट्प्रद
दूरची नदी खुणावते....
तप्त तापली धरणी
आग ओके ऊन
परी पाय चालतात
झपझप..
इवलिशी पोर
वाही संसाराचा भार
मुलपण सारे हरवले..
सावळीशी काया
रापलेली पार
डोळ्यांत कारुण्य अपार
दाटलेले..
नदिचाया आता
उरला ओहोळ
पाणी सगळाले
आटलेले..
होउन हताश
घागर टेकली
डोळ्यांच्या पूरात
वाहिलेली.. !
जान्हवी
पुन्हा एकदा सावरकर
पु.ल.देशपांड्यांचा सावरकरांवरचा एक लेख वाचून सुचलेली हि कविता ..
पु.ल.देशपांड्यांचा सावरकरांवरचा एक लेख वाचून सुचलेली हि कविता ..
तेज:पूंज तेजोनिधी
अंधार नाशनापरी
प्रभाकर हा भूवरी
वीर एक जन्मला .. १
झुंजझूंज रात्रंदिन
पराक्रमेच जनन मरण
विज्ञानवाद एक तारण
सकलांस शिकविला..२
अंगार हा पायातळी
भितो कोण तया परी
आत्मार्पने नित्य सिध्द
समोरी उभा ठाकला..३
ओजस्वी अशी प्रभा
ब्रम्हतेज झळकते
स्वधर्म , स्वभूमी रक्षिता
अपराजित राहिला..४
सिंह हा खलांवरी
देव हा भल्यांपरी
विरपुरूष हा करारी
धर्मविर जाहला..५ !
जान्हवी
तरंग
तरंग
तरंग उमटले तेंव्हादोघांच्याही
भोवती मी समजले ,
हेच हवसं,हेच अपेक्षित...
मी बुडालेय ,खोल खोल आत
खोल तुझ्या अंतरंगात,
ओलेती अन जखमी होउन तुझ्या तळापर्यंत..
माझा उडाला टवका
तू विचारलच नाहिस पण माझ्या दुखवल्या मनाला..
कदाचित ... कदाचित तुला प्रश्न असेल..
दगडाला कुठे असतं मन ..अन कुठे असते जागा दु:खाला..?
काळ लोटलाय जरासा...
आता कुठले नामोनिशाण कशासाठी ?
तुझ मन पुन्हा तसच ..
स्वच्छ आणि नितळ...
कदाचित....कदाचित...नविन दगडाला मोहात पाडण्यासाठी .... !
जान्हवी
तरंग उमटले तेंव्हादोघांच्याही
भोवती मी समजले ,
हेच हवसं,हेच अपेक्षित...
मी बुडालेय ,खोल खोल आत
खोल तुझ्या अंतरंगात,
ओलेती अन जखमी होउन तुझ्या तळापर्यंत..
माझा उडाला टवका
तू विचारलच नाहिस पण माझ्या दुखवल्या मनाला..
कदाचित ... कदाचित तुला प्रश्न असेल..
दगडाला कुठे असतं मन ..अन कुठे असते जागा दु:खाला..?
काळ लोटलाय जरासा...
आता कुठले नामोनिशाण कशासाठी ?
तुझ मन पुन्हा तसच ..
स्वच्छ आणि नितळ...
कदाचित....कदाचित...नविन दगडाला मोहात पाडण्यासाठी .... !
जान्हवी
Subscribe to:
Posts (Atom)