सरोज नयन अन श्यामल कान्ति ,
तेज अलौकिक जणु दिव्य ज्योती !
पितांबर नेसे मुकुट शिरावर ,
पाठी शर नि धनू करावर !
प्रसन्न मुद्रा भाव साजिरे,
सीता लक्षमण दो बाजूसी सजले !
हात समोरी आशीष द्याया,
भक्तजनांवर वेडी माया !
अशी मुर्ती तुझी राघवा ,
कोरुनी राहो माझे र्हूदया !
नित्य वदो मी नाम तुझे ,
चित्त सदैव तुज लागो भजे !
क्रुपा असावी दे वचनी,
एकची मागणे आता तव चरणी !
जान्हवी
No comments:
Post a Comment