Wednesday, April 21, 2010

प्रार्थना

हे गजानना गजवदना
आलोशरण तूला प्रभूराया ... ध्रू

हे मोह्पाश सारे जळू दे
हि विसरू दे सारी माया .. १

उगा कुविचारे झालो त्रस्त
लाभू दे रे तव छाया .. २

मम कुंठित झाली मती सारी
तू सुचव मार्ग मम राया .. ३

मी पतित असा तव चरणी आलो
घे सामावूनी तव ह्रुदया .. ४

हे गजानना गजवदना
आलोशरण तूला प्रभूराया ... ध्रू

जान्हवी

No comments: